माय महाराष्ट्र न्यूज:15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा नाही. मुंबईत गेल्यावर त्याबाबतचा पाठपुरावा दिल्लीकडे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दिली. त्याचवेळी कोविडबाबतचे निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत. मात्र, जोपर्यत आपण पूर्णपणे कोरोना मुक्त होत नाही, तोपर्यंत मास्क वापरावाच लागणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात थिएटरमध्ये 50 टक्के उपस्थितीला पारवानगी आहे. इतर सभागृहांतील कार्यक्रमांसाठी मात्र 200 जणांच्या उपस्थितीची मर्यादा आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यात शिथिलता आणण्याचा विचार आहे. लग्न समारंभांना बंधन आहेत.
सभागृहाची दोन हजार लोकांची क्षमता असेल तर एक हजार लोकांना परवानगी मिळत नाही. फक्त दोनशे लोकांनाच परवानगी आहे. त्यामुळे या निर्बंधात शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
जम्बो हॉस्पिटलचे काम पारदर्शी पद्धतीने व्हावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. राजकीय पदाधिकाऱ्यांना त्यात स्थान नव्हते. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यात निर्णय घेतले.
इथल्या बाबतीत आम्ही काही चुकीचे होऊ दिले नाही. जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.