Thursday, June 30, 2022

फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय; होईल लाखोंचा नफा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात कोरफडीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक कंपन्या त्यापासून उत्पादनं बनवतात. देशातल्या लघुउद्योगांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत अनेक व्यवसाय कोरफडीपासून तयार केलेली उत्पादनं

विकून करोडोंची कमाई करतात. कोरफडीची दिवसेंदिवस वाढत असलेली मागणी पाहता, तुम्हीही त्याची शेती करून लाखोंची कमाई करू शकता.तुम्ही कोरफडीसंबंधीचा व्यवसाय दोन प्रकारे करू शकता.

एक म्हणजे त्याची शेती करून आणि दुसरा म्हणजे त्यापासून ज्यूस किंवा पावडर तयार करण्याचा प्लांट उभारून. आज आम्ही तुम्हाला कोरफडीची शेती आणि प्रोसेसिंग प्लांटसाठी येणारा खर्च यासंबंधित काही

माहिती देत आहोत. यामध्ये कमी खर्चात उत्पादन घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त नफा कमवता येईल.तुम्ही 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीत शेतामध्ये कोरफडीची लागवड करू शकता.

उत्पादक कंपन्यांना आणि मंडईमध्ये ती विकू शकता. याशिवाय, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर तुम्ही कोरफडीचं प्रोसेसिंग युनिट सुरू करून भरपूर नफा कमावू शकता .

तुम्ही कोरफड प्रोसेसिंग युनिट सुरू करून त्यापासून जेल, ज्यूस तयार करून ते विकून मोठी कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला 3 ते 5 लाख रुपये खर्च करावे लागतील. कोरफडीची शेती करायची असल्यास आवश्यक घटक, रोपं, खत, मजूर, कापणी,

पॅकेजिंग इत्यादींवर खर्च करावा लागतो. देशाच्या अनेक भागांत कोरफडीचं रोप एकदा लावून 3 वर्षं उत्पादन घेतलं जातं, तर अनेक ठिकाणी 5 वर्षं पीक घेतलं जातं.कोरफडीची शेती किंवा व्यवसाय

तुम्ही सुमारे 50 ते 60 हजार रुपये गुंतवणूक करून सुरू करू शकता. त्यामधून 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत नफा कमावू शकता. कॉस्मेटिक्स, मेडिकल आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रात कोरफडीची मागणी खूप जास्त आहे.

अ‍ॅलो व्हेरा ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शाम्पू यांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!