नेवासा
शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर पोटखराबा नोंदी असल्यामुळे त्या क्षेत्राला वर्षानुवर्षे बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. पिकाचे नुकसान झाल्यास त्याचा विमाही मिळत नव्हता. ना.शंकरराव गडाख यांचे पाठपुराव्याला यश आले असून नेवासा तालुक्यातील पोटखराबा क्षेत्राचे लागवडी योग्य क्षेत्रात समावेश करून दुरुस्त केलेल्या उताऱ्याचे वाटप जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचे हस्ते आज दि.12 रोजी सोनई येथे करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा पोटखराब्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने सोडवला असून शेती पोटखराबा क्षेत्राचा समावेश लागवडीलायक क्षेत्रात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावरील पोटखराब बाबतीत प्रश्न मार्गी लागावा यासाठी तीन महिन्यापुर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना.गडाख यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनांचा स्विकार करुन ना.गडाख यांनी शेतकऱ्यांसमवेत बैठक घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासित केले होते.
त्याप्रमाणे आज सोनई येथे ७/१२ उताऱ्यावरील शेती पोटखराबा क्षेञ नोंद काढून त्या क्षेञाचा लागवडी योग्य क्षेञात समावेश करुन सातबारा उतारे शेतकऱ्यांना वाटण्यात आले.
उताऱ्यावर पोटखराबा असल्यामुळे त्या क्षेत्राला वर्षानुवर्षे बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. पिकाचे नुकसान झाल्यास त्याचा विमाही मिळत नव्हता पोटखराब्याचे नोंदीमुळे येणाऱ्या अडचणी आता राहणार नाहीत.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, नेवासा तालुका बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजीराव शिंदे,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यासह तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.