माय महाराष्ट्र न्यूज:खरीप हंगामापासून सुरु करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी’ चा लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. माझी शेती, माझा सातबारा अन् माझ पीक या घोषवाक्यानुसार शेतकऱ्यांनाच आपल्या पिकांची नोंद करायची आहे.
15 ऑगस्ट 2021 पासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात करण्यात आली होती. खरीप हंगामात 98 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची अचूक नोंद केली होती. त्यामुळे नुकसानभरपाईही मिळाली. आता रब्बी हंगामातही हीच पध्दत
अवलंबण्यात येत आहे. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांकडे केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. खरीप हंगामाच्या दरम्यान याबाबत जनजागृती करण्यात आल्याने
ही प्रक्रिया शेतकऱ्यांना अवगत झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्याचे आवाहन कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.रब्बी हंगामात पेरा केलेल्या पिकांची नोंद ही ‘ई-पीक पाहणी’ या अॅपच्या माध्यमातून
शेतकऱ्यांनाच भरावी लागणार आहे. याबाबत खरीप हंगामात कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची नोंद करताना अपडेट अॅप घ्यावे लागणार आहे.
तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हे अॅप अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता पीक नोंदीसाठी तलाठ्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांनाच 7/12 उताऱ्यावर पिकांची नोंद करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान
झाले तरी शेतकऱ्यांना या माध्यमातून नुकसानभरपाई मिळू शकणार आहे.रब्बी हंगामातील पिके बहरलेली आहेत. यंदा पावसामुळे पेरण्या उशिराने झाल्या होत्या. त्यामुळे पीक नोंदणीसाठीही वाढीव कालावधी देण्यात आला होता. आता 15 फेब्रुवारी
ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्येच शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची नोंद करावी लागणार आहे. रब्बी हंगामात विशेष करुन हरभरा, गहू, राजमा, ज्वारी या पिकांचा पेरा झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा
प्रत्यय यंदा शेतकऱ्यांना आलेलाच आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर ‘ई-पीक नोंदणी’ हेच महत्वाचे ठरणार आहे.