Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यात ३ ते ४ दिवसात ऑक्सिजन व रेमडीसीवर औषधांचा पुरवठा सुरळीत होईल-पालकमंत्री

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज.:कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामविकासमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. हसनजी मुश्रीफ यांनी कोपरगाव तालुक्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

मा.ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांनी ग्रामीण रुग्णालय, एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोविड केअर सेंटर व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरची पाहणी केली तसेच याठिकाणी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे कौतुक केले.

यावेळी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात ऑक्सिजन व रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सदर मागणीवर मा. मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या ३ ते ४ दिवसात ऑक्सिजन व रेमडीसीवर औषधांचा पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले साहेब, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज पाटील साहेब, खासदार श्री. सदाशिव लोखंडे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा, प्रांताधिकरी श्री. गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक श्री. संजय सातव, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती श्री. अर्जुन काळे, नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे,

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, कोपरगाव शहराचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, नायब तहसीलदार मनिषाताई कुलकर्णी,

डॉ. वैशालीताई बडदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,

नगरसेवक गटनेते विरेन बोरावके ,मंदार पहाडे, अजीज शेख, डॉ. योगेश कोठारी, डॉ. तुषार गलांडे, नारायण लांडगे, निखिल डांगे, चंद्रशेखर म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदर सिंग डडियाल, युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, भरत मोरे, सुनील साळुंके, नितीन शिंदे, अनिल गायकवाड, संतोष गंगवाल आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!