माय महाराष्ट्र न्यूज:विवाहित तरुणाने घरातील छताच्या लोखंडी पाइपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे गावात शनिवारी
ही घटना उघडकीस आली आहे. हर्षल अनिल राणे (वय 26) असे मृताचे नाव आहे.हर्षलच्या मित्रांनी शनिवारी सकाळी त्याच्या घरी जाऊन बाहेरून आवाज दिला. मात्र, घरातून प्रतिसाद मिळाला नसल्याने
खिडकीतून डोकावले असता, हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मित्रांनी ही माहिती तत्काळ परिसरातील नागरिकांना दिल्याने घराचा दरवाजा तोडून हर्षलचा मृतदेह खाली घेण्यात आला. घटनेची
माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हर्षलचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शनिवारी दुपारी शवविच्छेदनानंतर हर्षलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
राहुरी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. हर्षलच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. बी. निकम तपास करीत आहेत.