माय महाराष्ट्र न्यूज:महावितरण प्रशासन राज्यातील शेतकऱ्यांकडून सक्तीने थकबाकी वसुली सुरू आहे. राज्यातील ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नुकतेच कोरोनातून बरे झाले.
या घटनाक्रमाच्या आधारे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या शैलीत टीका केली.माळी बाभूळगाव जिल्हा परिषद गटातील राघो हिवरे, जोहारवाडी, मोहोज, खांडगाव व मांडवे या गावांत सुमारे
साडेचार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.शिवाजी कर्डिले म्हणाले, शेतकऱ्यांकडून डीपीचे पैसे सक्तीने वसूल केले. त्यामुळे लोकांसमोर जाता येत नाही म्हणून ‘ ते ‘ कोरोनाचे नाटक करीत
असल्याची टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांचे नाव न घेता केली.कर्डिले पुढे म्हणाले, की शेतकरी संकटात असतानाही शेतकरीहिताचे निर्णय न घेता वीजमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून वीजबिल सक्तीने वसूल केले. शेतकऱ्यांनीही
प्रामाणिकपणाने पैसे भरले. मात्र, पैसे भरूनही मंत्री वीज देत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.राहुरी नगरपालिकेत काय केले? 1972 मध्ये पाणीयोजना झाली त्यानंतर नवीन योजना केली का? आम्ही 27 कोटी
रुपयांची नवीन पाणीयोजना आणली. तिचे श्रेय कर्डिलेंना मिळेल म्हणून तिला स्थगिती दिली, अशी टीकाही त्यांनी केली.