Friday, July 1, 2022

पत्नीने प्रियकरासोबत भाजप नेत्या पतीचा काटा काढला; कारण धक्कादायक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोएडातील एका भाजप नेत्याच्या पत्नीवर व्हॅलेंटाईन सवार झाला होता. निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या मनसुब्याने नेत्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला.

स्थानिक भाजपा नेत्याची हत्या त्याला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम आणि जमीन हडपण्यासाठी करण्यात आली.पत्नीने तिच्या प्रियकरासोबत या नेत्याची हत्या केली. ओळख लपविण्यासाठी

नेत्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन दिवसांत तपास करत चार लोकांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितलेकी, ९ फेब्रुवारीला भाजपाता बुथ अध्यक्ष

वीरपाल यांची हत्या करण्यात आली. पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार सिंह यांच्या टीमने आरोपींना पकडले आहे. त्यांच्या चौकशीत वीरपालची पत्नी नेहा हिचे गेल्या तीन वर्षांपासून मुकेश उर्फ सोनूसोबत

प्रेमसंबंध होते. दोघांनीही मिळून वीरपालला वाटेतून हटविले.त्यांनी सांगितले की याच दरम्यान नेहाला समजले की वीरपालला यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात एक कोटी रुपये आणि प्लॉट

मिळणार आहे. या पैशाच्या आणि जमिनीच्या लालसेपोटी वीरपालच्या हत्येचा कट रचला गेला.नेहा आणि मुकेशने वीरपालला मारण्यासाठी राजकुमार आणि भूदेव शर्मा यांना 50 हजार रुपये दिले. ९ फेब्रुवारीच्या रात्री चौघांनी त्याच गळा आवळून

खून केला. त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर मृतदेहावर रजई टाकून आरोपी पळून गेले. वीरपालला 13, 11 आणि 7 वर्षांची तीन मुले आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!