माय महाराष्ट्र न्यूज: आदर्शगाव सुरेशनगर (ता.नेवासा) च्या वतीने तालुक्यातील पत्रकार,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व सेवाभावी व्यक्तींचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व महंत भास्करगिरी महाराज
यांच्या हस्ते नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल गर्जे, माजी अध्यक्ष विनायक दरंदले, संदीप गाडेकर, पत्रकार ज्ञानेश सिन्नरकर,श्रीनिवास रक्ताटे,देवीदास चौरे,सुधीर चव्हाण, अभिषेक गाडेकर, बाळासाहेब पंडित, संदीप वाखुरे,कैलास शिंदे,
बाळासाहेब देवखिळे, अमोल मांडण यांचा शाल, श्रीफळ,फेटा व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेशनगर ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी केले. स्वागत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश उभेदळ यांनी केले.
कार्यक्रमास त्रिवेणीश्वर देवस्थानचे प्रमुख महंत शामानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत ॠषीनाथ महाराज, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, बाजार समितीचे सभापती शिवाजी शिंदे,नेवासा नगरपंचायतीचे
उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस, स्वयंसेवीकांचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.रेवणनाथ पवार यांनी केले.
आभार अनिताताई उभेदळ यांनी मानले.सुप्रिया झिंजर्डे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.