माय महाराष्ट्र न्यूज:दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या किंवा त्या पुढे ढकलण्याची मागणी करणाऱया विद्यार्थ्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
बोर्डाच्या लेखी परीक्षांऐवजी पर्यायी मूल्यमापन पद्धतीची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. अनुभा सहाय
यांच्यामार्फत महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ओडिशा स्टुडंट युनियनने ही रिट याचिका केली आहे.कोरोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. बहुतेक पालकांनी कोरोना
संसर्गात पाल्याला शाळेत पाठविण्यास संमतीपत्र दिलेले नाही, असे अॅड. प्रशांत पद्मनाभन यांनी रिट याचिकेत म्हटले आहे.बोर्ड परीक्षा २०२२ रद्द होण्याची शक्यता आता कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मूल्यांकनाचे पर्यायी मार्ग शोधण्याची
मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार बोर्डांने परीक्षा आयोजित करण्याबाबत वेळेत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकालावेळी त्रास होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांकडून दाखल याचिकेनुसार, अंतर्गत मूल्यमापनात समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित परीक्षा आयोजित करुन दिलासा मागण्यात आला आहे. ही प्रक्रिया २०२०-२१ च्या परीक्षांमध्ये अनेक बोर्डांद्वारे देखील केली जाते असे यात म्हटले आहे.