माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन व लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते व ना. शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. नामदार गडाख यांच्या संकल्पनेतून नगर जिल्ह्यात शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी एक वर्षांपासून सुरू असलेल्या
शिवसंवाद मेळाव्यानिमित्त सोनईतील आमराई विश्रागृह येथे नगर जिल्हा शिवसंवाद मेळावा झाला.शिवसंवाद बैठकीत शिवसैनिकांशी संवाद साधताना ना. पाटील म्हणाले, एक महिन्यासाठी असलेले शिवसंवाद
अभियान ना. शंकरराव गडाख यांनी गेल्यावर्षांपासून नगर जिल्ह्यात सुरू ठेवले ही संघटनेच्या दृष्टीने अभिनंदनीय बाब आहे. ना. शंकरराव गडाख यांनी नगर जिल्ह्यात सुरू केलेला पक्ष संघटना
वाढीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी गाव पातळीवर काम करून संघटना बळकट करावी. पक्षाचे, मंत्रीमंडळाचे काम घराघरांत पोहचावे. आपण केलेल्या कामांचे क्रेडिट घ्यावे.
ना. गडाख यांच्यासारखे नेतृत्व मिळाले असल्याने नगर जिल्ह्यात शिवसेना बळकट झाली आहे.याप्रसंगी ना. शंकरराव गडाख म्हणाले, जिल्ह्यातील हाडाच्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील पाणी योजनांना ना. गुलाबराव पाटील यांच्यामुळे मंजुरी मिळाली आहे.काम करणारे व स्पष्टवक्ते माणूस ना. पाटील आहेत त्याच्या रूपाने मला मंत्रिमंडळात एक जिवाभावाचा दिलखुलास मित्र लाभला आहे.
नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कुठलेही प्रश्न असतील तर निःसंकोचपणे सांगावे शिवसेना वाढविण्यासाठी शिवसंवाद अभियान कायम सुरू ठेवू. जिल्ह्यात कुणाचाही विरोध असला तरी शिवसेना वाढवू. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन
योजनेअंतर्गत एकाच वर्षात 1100 ते 1200 कोटी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत. यात शिवकालीन, निजामकालीन व इतर जुन्या पुरातन बंधारे दुरुस्तीचा धडक कार्यक्रम सुरू केला असून ही कामे सुरू असताना शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा.