Friday, July 1, 2022

अत्यंत धक्कादायक:साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिल्याने खळबळ माजलीय.

या दहशतवाद्यांचं पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं गुजरात दहशतवादविरोधी पथकानं सांगितले.या घटनेनंतर शिर्डी शहरात खळबळ उडालीय. दुबई येथील अटक केलेले

अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घराची रेकी केली. या अतिरेक्यांकडं अवैध हत्यार, विस्फोटक पदार्थ मिळून आले आहेत.

या अतिरेक्यांचे पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचं गुजरात एटीएसनं म्हटलंय. याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवींसह दोन अशा आठजणांना अटक करण्यात आली.

शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्यानं याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र, तसेच मेल आलेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील

घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली दिलीय. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!