माय महाराष्ट्र न्यूज:पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा एका अभिनेत्रीने व्यक्त केली. आता पुन्हा तिच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
‘रामायण’ आणि ‘एफआयआर’ मालिकेतून प्रेक्षकाच्या भेटीस आलेली अभिनेत्री माहिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘आफ्रिदी प्रति माझं प्रेम इतकं आहे की, मला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.
आता पुन्हा माहिका तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. स्पॉटबॉयनुसार माहिका म्हणते, ‘सध्या आफ्रिदीची नर्स होण्याची मला संधी मिळायला हवी.कारण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझा पहिला क्रश त्रासात आहे.
त्यामुळे मला दुःख होत आहे. असं माहिका म्हणाली.नुकतेच आफ्रिदी म्हणाला होता की, ‘गेल्या 15-16 वर्षांपासून मला पाठीचा त्रास आहे. तरी देखील मी खेळत होतो, पण आता हा त्रास इतका वाढला
आहे की त्याचा परिणाम माझ्या मांडीवर, गुडघ्यावर होत आहे. आफ्रिदी प्रकृती ठिक नसल्यामुळे तो खेळत नाही. माहिका शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘रामायण’ आणि ‘एफआयआर’
मालिकांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाही तर तिने मिस टीन नॉर्थईस्ट इंडियावर स्वतःचं नाव कोरलं आहे.