माय महाराष्ट्र न्यूज:रस्त्याने जाताना शेजाऱ्याचा कुत्रा भुंकतो म्हणून एकाने निर्दयपणे कुऱ्हाडीचे घाव घातले. यामध्ये कुत्रा जखमी झाला आहे. मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून घाव घालणाऱ्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे ही घटना घडली. तेथील गणपत म्हसे यांच्याकडे पाळीव कुत्रा आहे. पोपट पवार (रा. कोंढवड) यांचे म्हसे यांच्या घरासमोरून जाणे-येणे असते.
त्यावेळी हा कुत्रा भुंकतो. याचा राग धरून पवार यांनी कुत्र्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. यामध्ये कुत्रा जखमी झाला.त्यानंतर म्हसे यांनी कुत्र्यासह राहुरी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना
हकिगत सांगून रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पवार याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल केला आहे. जखमी कुत्र्यावर राहुरीतील पशू वैदयकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.