नेवासा
पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल “ड” यादीच्या जाचक अटी रद्द करून फेरसर्वे करावा अशी मागणी नेवासा तालुका लोकसेवक सरपंच संघटनेने केली आहे.
नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना दिलेल्या निवेदनात सरपंच संघटनेने म्हंटले आहे की,सध्या प्रत्येक गावात पंतप्रधान आवास योजना ‘ड’ शादी सर्वे सुरू आहेत. परंतु जाचक अटीमुळे अनेक गरजू लाभार्थी या योजने पासून वंचित राहणार आहेत. तालुक्यातील भेंडा खुर्द व प्रवरासंगम गावची लाभार्थी यादीच उपलब्ध नसल्याने सर्वेक्षण नाही. सदर गावची यादीच उपलब्ध नसल्याने सर्वे झाला नाही. यावा. सदर गावची यादी उपलब्ध करून सर्व्हे करण्यात यावा.काही गावातील गरजू लाभार्थीची नावे वगळली गेली आहेत. याबाबतही गांभीर्याने विचार करण्यात यावा.
तसेच 15 व्या वित्त आयोग बंधीत-अबंधित निधी खाते शासनाने आयसीआयसीआय बँकेत उघडण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु सदर बँकेची शाखा जवळ नसल्याने अत्यंत गैरसोय होत आहे. सदर जवळच्या राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडण्यास परवानगी मिळावी.त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजना खाते सध्या गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे नावे उघडण्यात आली आहेत सदर खाते हे सरपंच व ग्रामसेवक यांचे नावे उघडण्यास परवानगी देण्यात यावी.यासर्व मागण्यांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
निवेदनावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनकरराव गर्जे,शरद आरगडे,भाऊसाहेब सावंत,सुनील खरात,अमोल अभंग, अड.राजेंद्र पंडीत,गोरक्षनाथ तनपुरे,श्रीकांत पवार,
विष्णु गायकवाड,गोरक्षनाथ शिंदे,कैलास दरंदले,अश्विनी औताडे,अनिल लहारे,अजय साबळे,जालिंदर कचे,दत्तात्रय भारस्कर,साहेबराव गारुळे, रंजना आहेर,सुनीता लांडगे,अर्चना सुडके,वसंतराव उकिरडे,विठ्ठल शिंदे,वनमाला चावरे,संदीप देशमुख, सुरेश डिके, बाळासाहेब म्हसरूप ,संतोष लिपणे,बंडू चौघुले ,दीपक मोरे या सरपंचाच्या सह्या आहेत.