श्रीरामपूर
दरोड्याचे तयारीत असणारी टोळी श्रीरामपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, दि. १४/०२/२०२२ रोजी ०१/१५ वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक संजय सानप यांना माहिती मिळाली की, शिरसगांव शिवारातील ओव्हर ब्रीज जवळ, इंदिरानगर जाणारे रोडवर काही संशयीत इसम दरोडा टाकण्याचे तयारीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तपास पथकाचे स.पो.नि. जिवन बोरसे, पोना सचिन बैसाणे, पोना पंकज गोसावी, पोकॉ राहुल नरवडे, पोकॉ गौरव दुर्गुळे, पोका रोंगटे यांना बातमीतील माहिती सांगून कारवाई करणे कामी रवाना केले.
तपास पथक हे शिरसगांव शिवारात ओव्हर ब्रीज जवळ इंदिरानगर येथे गेले असता, नमूद बातमीतील वर्णना प्रमाणे पाच इसम ओव्हर ब्रीज जवळ इंदिरानगर जाणारे रोडवर फिरत असलेले दिसून आले. त्यावेळी तपास पथक त्यांचे दिशेने जात असतांना सदर संशयीत इसमांना तपास पथकाचा सुगाव लागताचे ते पळून जावून लागले. त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तीन इसमांना पकडले व त्यातील दोन इसम मोटार सायकलवर भरधाव वेगात पळून गेले. त्यांचे पाठलाग करण्यात आला परंतू ते मिळून आले नाही.
सदर पकडलेल्या इसमांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे निसार रज्जाक शेख (वय ३८ वर्षे) रा. हुसैननगर वार्ड नं. १ श्रीरामपूर, राजु शामराव दामोधर (वय ४३ वर्षे) रा. हुसैननगर वार्ड नं. १ श्रीरामपूर, तौफिक आयुब पठाण (वय २७ वर्षे) रा. हुसैननगर वार्ड नं. १ श्रीरामपूर असे सांगितले. सदर इसमांचे दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता निसार रज्जाक शेख याचे अंगझडतीत एक चाकू, नायलॉन दोरी मिळून आले. राजु शामराव दामोधर याचे अंगझडतीत पॅन्टचे खिशात मिरची पुड मिळून आले तौफिक आयुब पठाण याचे अंगझडतीत लोखंडी कटावणी मिळून आले आहे.
अशी वरीलप्रमाणे हत्यारे व मुद्देमाल मिळून आल्याने पोकॉ गौरव राजेंद्र दुर्गुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त आरोपीविरुध्द श्रीरामपुर शहर पोस्टेला गु.र.नं. ८८/२०२२ भादविक ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर आरोपी विरुध्द विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हा दाखल आहेत
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय सानप, सपोनि जिवन बोरसे, पोना पंकज गोसावी, पोना बिरप्पा करमल, पोना सचिन बैसाने, पोना रघुवीर कारखेले, पोकों राहुल नरवडे, पोकों गौतम लगड, पोकों रमिज आत्तार, पोकों गौरव दुर्गुळे, पोका महेश पवार यांनी केली आहे.