Sunday, June 4, 2023

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाचे पुरस्कार सर्वांना प्रेरणादायी ठरतील मिळेल-अरुण कडू

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा:सामजिक कार्य करणाऱ्या  व्यक्तींचा कौतुक-सन्मान करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाचे पुरस्कार सर्वांना प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे  जनकल्याण  फाऊंडेशनच्या वतीने दि.३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन देण्यात येणारे सन २०२३ चे संत तुकडोजी महाराज पुरस्कारांचे वितरण शब्दगंध साहित्य

परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील गोसावी यांचे हस्ते,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांचे अध्यक्षतेखालीपुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. कडू बोलत होते.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे,

ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक अड.देसाई देशमुख, अड.बंशी सातपुते, डॉ.अशोकराव ढगे,जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे
व्यासपीठावर उपस्थित होते.

जलमित्र सुखदेव फुलारी(समाजभुषण),रावसाहेब मगर(सामाजिक),सुभाष सोनवणे (साहित्य),सौ.रोहीणी चंद्रकांत जाधव (आरोग्य),भगवान सुर्यभान मरकड(कृषिभुषण),राजेंद्र देसाई (पत्रकारीता),दादासाहेब आरगडे(आदर्श ग्रामसेवक), शिवशाहीर अक्षय डांगरे (कलावंत), सौ.अनिता कानडे,पाथर्डी(आदर्श शिक्षिका),अनिल सरोदे(ग्रंथपाल),
अलका सातपुते(आदर्श आरोग्य सेविका) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

श्री.कडू पुढे म्हणाले की,ग्रामीण भागापेक्षा नागरिकरण वाढत असेलेल्या ठिकाणी वृद्धांच्या संबंधातल्या फार मोठ्या अडचणी येऊ पहात आहेत किंवा आलेल्या आहेत. माणसं इतके संकुचित स्वभावाचे होत चाललेत की कुटुंब व्यवस्थेत स्वतःचे आईबाप सुद्धा माणसाला जड होत आहेत म्हणून

वृद्धाश्रम वाढत आहेत.जो उच्च कोटिचे सामाजिक काम करतो त्याला समाजाने संत म्हणून नावाजलेले आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेत आपल्या जीवनातील एक एक अंगाचा विचार मांडलेला आहे.उदंड झाले पुरस्कार सोहळे उदंड झालेत अशी टिका होत असताना ही सामजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्य व्यक्तींचा कौतुक-सन्मान करणारा हा जनकल्याण फाउंडेशनचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार आहेत.

प्रमुख पाहुणे सुनील गोसावी म्हणाले,विविध क्षेत्रातील हिऱ्यांना निवडून त्यांचा सन्मान करून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने दिलेल्या पुरस्काराने पुरस्कारार्थीना सदैव प्रेरणा मिळत राहिल.

स्पर्धा परीक्षामध्ये ज्यांनी यश मिळवलं त्यांचा सन्मान जनकल्याण फाउंडेशनने केला.जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा अभ्यास करत आहे त्याच्यासाठी ही प्रेरणा दायी गोष्ट आहे. पुरस्कार मिळाल्याने त्या माणसाला त्याच्या कार्यात अजून आवड निर्माण होईल व प्रेरणा मिळेल.पुरस्कार हे नेहमी प्रेरणा देत असतात.कॉ.बाबा आरगडे,सुखदेव फुलारी,रावसाहेब मगर,सुभाष सोनवणे,

रज्जाक शेख,ऐश्वर्या नवले यांनी ही मनोगत व्यक्त केले.विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवीणारे अमोल धुमाळ (राज्य कर निरीक्षक), राहुल शेरकर (राज्य कर निरीक्षक), कु.ऐश्वर्या नवले (भु-कर मापक) या गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सरपंच संतोष रोडगे, सोसायटी चे अध्यक्ष रावण गारुडे,गीतराम रोडगे, बाबासाहेब महाराज रोडगे, तुळशीराम तुपे, पोपट उगले, राहुल कोळसे,रमेश पाडळे, संतोष औताडे, मनीष रोडगे, अण्णासाहेब वाघुले, अशोक रोडगे, सर्जेराव पवार, ज्ञानेश्वर वाघुले, रंगनाथ शेजुळ, उत्तम सुसे, सुरेश रोडगे
आदी यावेळी उपस्थित होते.

प्राध्यापक राजेंद्र गवळी व अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी आभार मानले.

*हे आहेत समाजभूषण पुरस्काराचे मानकरी*

जलमित्र सुखदेव फुलारी,भेंडा (समाजभुषण),रावसाहेब मगर,नेवासा (सामाजिक),सुभाष सोनवणे,नगर (साहित्य),सौ.रोहीणी चंद्रकांत जाधव (आरोग्य),भगवान सुर्यभान मरकड,मढी(कृषिभुषण),राजेंद्र देसाई,वडाळा महादेव (पत्रकारीता),दादासाहेब आरगडे,सौंदाळा(आदर्श ग्रामसेवक), शिवशाहीर अक्षय डांगरे (कलावंत), सौ.अनिता कानडे,पाथर्डी(आदर्श शिक्षिका),अनिल सरोदे,कुकाणा (ग्रंथपाल),अलका सातपुते(आदर्श आरोग्य सेविका).

*अनुदान नको मदत द्या…*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित झालेले शरणापुर वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर म्हणाले, वृद्धाश्रमात सध्या २५ वृद्ध आहेत. त्यांच्या एक वेळ जेवणाचे सुद्धा चणचण भासत आहे. मला शासनाचे अनुदान नको तर दररोज एक दिवसाचे अन्नदान करणाऱ्यांच्या मदतीची गरज आहे,ती मदत सर्वांनी करावी अशी विनंती केली.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!