माय महाराष्ट्र न्यूज:इंडिया पोस्टने एक अधिसूचना जारी करून मेल मोटर्स सर्व्हिस विभागांतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 17 पदांची भरती केली जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 10 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट द्यावी लागेल.
पद: स्टाफ कार ड्रायव्ह (सामान्य श्रेणी)
रिक्त पदांची संख्या : 17
पगार : लेवल -2 नुसार पगार दिला जाईल.
India Post Recruitment 2022: विभागनिहाय रिक्त जागांचा तपशील
मेल मोटर सर्विस कोईम्बतूर (Mail Motor Service Coimbatore): 11
इरोड विभाग (Erode Division): 02
नीलगिरी विभाग (Nilgiris Division): 01
सलेम पश्चिम विभाग (Salem West Division): 02
तिरुपूर विभाग (Tirupur Division): 01
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी (10th pass jobs) आणि त्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्सही असणे आवश्यक आहे.
वाहन चालविण्याचा परवाना जड आणि हलक्या अशा दोन्ही वाहनांसाठी असावा. उमेदवाराला तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केलेल्या नमुन्यात फॉर्म भरावा.
तसेच कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी, वयाचा पुरावा, फोटो, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.