माय महाराष्ट्र न्यूज:शेजार्यांनी विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. 14) अहमदनगर
जिल्ह्यातील शेवगाव शहरातील म्हसोबानगर परिसरात घडली.महिलेचा पती यांच्या फिर्यादीवरून जमीर उर्फ गोट्या रफिक शेख, त्याची पत्नी आसमा जमीर शेख व त्यांचा मुलगा शाकीर जमीर शेख
(रा. म्हसोबानगर, शेवगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता व विजय परदेशी हे शेजार्यांच्या घरासमोरील
अंगणात शेकोटीजवळ शेकत बसले असताना शेजारील शेख कुटुंबियांनी गेली दोन दिवसांपासून सातत्याने संगीता यांना चारित्र्यावरून शिवीगाळ केली. सोमवारी पुन्हा तिघांनी शिवीगाळ केली.
यामुळे त्रस्त संगीता यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फॅनला गळफास घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांना ग्रामिण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.