Friday, July 1, 2022

आज स्वस्त सोनखरेदीची सुवर्णसंधी! हा आहे आजचा दर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोन्याच्या दरांत मंगळवारी (15 फेब्रुवारी 22) तेजी दिसून आली होती. त्यानंतर सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 50,000 रुपयांवर पोहोचल्याचं दिसून आलं. मात्र आज (बुधवारी) सोन्याच्या

दरात 850 रुपयांनी घट झाली. खरं तर सोनं हा गुंतवणूकीसाठी एक सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. अनेक लोक गुंतवणुकीसाठी सोन्याला प्रथम प्राधान्य देतात. अर्थात याचे फायदेदेखील

अनेक आहेत. सध्या सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र आज, कमी झालेले सोन्याचे दर पाहता, ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची ही सुसंधी आहे.सध्या सोन्याच्या

दरांत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात तेजी नोंदली गेली. त्यानंतर सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50,000 रुपयांवर नोंदला गेला. दुसरीकडे आज एकाच दिवसात सोन्याचा दर थेट 850 रुपयांनी खाली आला. तुम्ही जर सोनं खरेदी

करण्याचा विचार करत असाल तर आज एक चांगली संधी आहे. मल्टिकमॉडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचे व्यवहार 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह होत आहेत. चांदीच्या दरांतही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी घसरून 49,350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 62,892 रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

सोन्याचे ताजे दर तुम्ही अगदी घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमाकांवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. यात तुम्ही सोन्याचे ताजे दर तपासू शकता.

या सुविधेमुळे सोन्याच्या दराचा अंदाज ग्राहकांना अगदी घरबसल्या घेता येतो. त्यामुळे ही सुविधा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!