Saturday, July 2, 2022

रेल्वेमध्ये तो करत होता हस्तमैथुन; महिलेने मोबाइलवर रेकॉर्ड केलं किळसवाणं कृत्य अन्…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकल ट्रेनमध्ये महिलेसमोर हस्तमैथुन करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. चेन्नईत ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे.

आरोपी लोकल ट्रेनमधील महिला डब्यात घुसून हस्तमैथुन करत होता.आरोपीची ओळख पटली असून लक्ष्मणन असं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं आहे.

प्रसिद्ध युट्यूब चॅनेलमध्ये काम करत असलेल्या महिला पत्रकाराने याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलेने ९ वाजून ४० मिनिटांनी लोकल पकडली.

ट्रेन पल्लवरम स्थानक गाठल्यानंतर आरोपी महिला डब्यात बसलेला असून हस्तमैथुन करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. यानंतर महिलेने मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड करत त्याला हटकलं. पुढील स्टेशन आल्यानंतर आरोपी ट्रेनमधून उतरला आणि पळून गेला.

महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. यादरम्यान महिलेने युट्यूबवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी केली.

माझ्या गळ्यात ओळखपत्र होतं आणि मी पत्रकार असल्याचं माहिती असतानाही तो माझ्यासमोर हस्तमैथुन करत होता. सर्वात आधी तर त्याने महिला डब्यात चढायला नको होतं आणि त्यातही त्याचं हे कृत्य करण्याचं धाडस? मी ओरडली असताना

त्याने बाहेर उडी मारुन पळ काढला. मी एकटी असताना त्याच्यासोबत अजून तीन चार जण असते तर काय झालं असतं? किमान या घटनेनंतर तरी सरकारने पावलं उचलावीत. महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही

असावेत किंवा रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक उपस्थित असावा. जर तुमच्या समोर अशी घटना घडली तर वाचा फोडा, लाजू नका. यामुळे इतर महिलांमध्येही जागरुकता निर्माण होईल,” असं महिलेने सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!