माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोक कारखाना परिसरात असणाऱ्या पाटाच्या वाहत्या पाण्यात मध्ये एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी काही ग्रामस्थांना दिसून आला.
त्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.सदर मृतदेह वाहत वाहत जगताप वस्ती भागाकडे गेला आहे.
पोलिस चौकशीचा ससेमिरा नको या गैरसमजामुळे ग्रामस्थांनी स्वतःहून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला नाही.त्यामुळे पोलीस आल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल असे समजते.
मयत तरूणाच्या अंगात काळ्या रंगाचे जर्किंग व पांढरा शर्ट घातल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.मृतदेह श्रीरामुरातुन अशोकनगर ला वाहत आला कि नेमके कोठुन आला ? याचा शोध पोलीस तपासातच लागेल.
या घटनेनं परीसरात एकाच खळबळ उडाली आहे.