माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध घोषणा केल्या आहेत.
देशातंर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवर अधिक भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक एप्रिलपासून या वस्तूंच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
मोबाइल फोन चार्जर ट्रान्सफॉर्मरचे भाग, मोबाइल कॅमेरा मॉड्युलचे कॅमेरा लेन्स आणि इतर भागांवर 5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत सीमा शुल्कात सवलत देण्यात आली आहे. यामुळे स्मार्टफोन उत्पादनाच्या खर्चात कपात होणार आहे. त्याचा फायदा युजर्सना होऊ शकतो.
स्मार्टवॉचसाठी वापरण्यात येणाऱ्या काही भागांसाठी सीमा शुल्कात मिळणारी सवलत 31 मार्च 2023 पर्यंत असणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात फारसी वाढ होणार नाही. त्यामुळे स्मार्टवॉचदेखील स्वस्त होतील.
वायरलेस इअरबड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांवर आयात कर वाढवण्यात आला आहे. युजर्सला वायरलेस ईअरबड्स, नेकबॅण्ड हेडफोन आणि अशाप्रकारच्या गॅजेट्स महाग होऊ शकतात.
हेडफोन्सच्या थेट आयातीवर आता 20% जास्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे याची किंमत अधिक वाढणार आहे.
कॉम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही भागांवरील आयात कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेफ्रिजरेटर महागण्याची शक्यता आहे.