नेवासा
चर्मकार समाजाची नम्रता सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. चर्मकार समाज नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करत असतात. चर्मकार समाजातील एकोपा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नेवासा तालुका बचत गटाच्या प्रणेत्या व माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे होते.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पंचायत समिती सदस्य वैशालीताई एडके, माजी सरपंच बाजीराव मुंगसे, हभप सुखदेव महाराज मुंगसे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, नामदेव घोडेचोर, माजी सभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच लक्ष्मण गोयकर, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, लक्ष्मणराव बनसोडे, कडूभाऊ तांबे, चंद्रभान कदम, सुभाष मुंगसे, बन्सी मुंगसे, जिल्हा अध्यक्ष अभिजित ससाणे, श्रीकांत हिवाळे, योसेफ हिवाळे, अशोक मुंगसे, मधुकर क्षिरसागर, विष्णू मुंगसे, महादेव मुंगसे, आकाश चेडे, किशोर मुंगसे, निवृत्ती मुंगसे, दादासाहेब वाहुरवाघ, संतोष तांबे, आजिनाथ आठरे, पप्पू मुंगसे, भारत कोकरे, उद्धव मुंगसे, दादासाहेब एडके, आकाश चेडे, संजय मुंगसे, कडूभाऊ दळवी, बहिरनाथ एडके, रामदास एडके, राजू एडके, बाळासाहेब बताडे, हरिभाऊ एडके, ग्रामविकास अधिकारी उल्हारे भाऊसाहेब, किरण काळे, मांडुळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री संत रोहिदास महाराज मंदिराच्या सभामंडपाच्या कठड्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के व सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश एडके यांनी केले. सूत्रसंचालन युनूस पठाण यांनी केले. तर जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*विकासकामाचा अनेक वर्षाचा अनुशेष भरून काढणार….*
यावेळी बोलताना सुनिताताई गडाख म्हणाल्या, तालुक्यात अनेक वर्षांपासून विकासकामाचा अनुशेष आहे. हा अनुशेष याच पंचवार्षिकमध्ये भरून काढण्याचा आमचा मानस आहे, त्यादृष्टीने नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.