माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री
नारायण राणे मैदानात उतरले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल.
इतकी लाज कुणी आणली नाही’ असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.दिल्लीत बसणारे पवार दिल्लीत शेपूट का घालतात.असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कसा माणूस बदलतो बघा, शेण खाणाऱ्यांबरोबर ५६ आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कुणी आणली नाही.
लोकांचे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा संजय राऊत बोलतो. शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी भाषा नव्हे, अशी टीका राणेंनी केली.उसने आवसान कशासाठी? तुमच्यात तो रग नाही. त्यासाठी रक्त लागतं. तुमच्यात भेसळ आहे. त्यांनी केलेले आरोप
बिनबुडाचे आरोप आहेत. त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. सरकार जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या मागे लागल्यास त्यांचे सर्व वाभाडे काढू. मग पळता भुई थोडी होईल” असा इशारा राणेंनी दिला.