Sunday, July 3, 2022

लहान मुलांना दुचाकी प्रवासासाठी नवे नियम ;अन्यथा हजार रुपये दंड आणि…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात इतके भीषण असतात की कायमचं अपंगत्व येतं.

यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी पावलं उचलताना दिसत आहे. चारचाकी वाहनांमध्ये थ्री पॉइंट बेल्ट आणि सहा एअरबॅग्सचा प्रस्ताव पुढे केल्यानंतर दुचाकीसाठी नवे नियम तयार केले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी

नवी नियमावली आखली आहे. नवीन वाहतूक नियमांनुसार दुचाकीस्वारांना मुलांसाठी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे अनिवार्य केले आहे, तसेच दुचाकीचा वेग फक्त ४० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.

नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात

सुधारणा करण्यात आली आहे. हा नियम चार वर्षांपर्यंतच्या मुलांना लागू असेल. नवीन नियमांनुसार, वापरलेले सुरक्षा हार्नेस हलके, जलरोधक, गादीयुक्त आणि ३० किलो भार वाहून नेण्याची क्षमता असणारे हवे.

राइडरने मुलाच्या सुरक्षिततेसाठी हार्नेस घालणे आवश्यक आहे.दुचाकी वाहनांसाठीच्या नवीन नियमांमध्ये चार वर्षांवरील मुलांनाही क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट शासनाने ठरवून दिलेल्या

मानकांपैकी असायला हवं. मुलांसाठी हेल्मेट बनवण्यास केंद्राने निर्मात्यांना आधीच सूचित केले आहे. दुचाकीस्वारांना मुलांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा याची खात्री करणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने नियमात बदल सुचविणारी एक मसुदा अधिसूचना जारी केली होती. यात रायडर्सना सेफ्टी हार्नेस आणि लहान मुलांसाठी क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!