Thursday, June 30, 2022

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ५ ते ६ रुपयांनी होणार वाढ ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नाहीत. निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या

दरात लिटरमागे ५ ते ६ रुपयांनी वाढ करू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्यानं कंपन्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी दरवाढ करणं

आवश्यक झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढत्या राहिल्या तर, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढतील.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक प्रबल सेन यांचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. जागतिक

बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली, तर देशांतर्गत बाजारात किंमत प्रतिलिटर ४५-४७ पैशांनी वाढते. मात्र परदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी दिवाळीपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे

दर स्थिर आहेत. नोव्हेंबरपासून कच्चे तेल प्रति बॅरल २५ डॉलरवर वर पोहोचलं आहे.रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्यानं आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी ९४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. २०१४ नंतर पहिल्यांदाच

क्रूडच्या किमतीने एवढी पातळी गाठली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२५ डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!