Friday, December 3, 2021

महसूलमंत्री म्हणतात मुंबई पुणे येथून येणाऱ्या पाहुण्यांना विलगीकरणा मध्ये ठेवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : पारनेरकरांनी लॉक डाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे लॉकडाऊन बाबत जो अनुभव आहे तो फार चांगला नाही अनेक ठिकाणी नागरिक गांभीर्याने घेत नाहीत .

त्यामुळे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे मात्र पारनेरकर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निर्बंधाचे पालन करत आहेत असे जर ३० तारखेपर्यंत नागरिकांनी गांभिर्याने पालन केले तर येत्या काही दिवसात पारनेर चा कोरोना रुग्णांचा आकडा सर्वात कमी राहील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आढावा बैठकीत बोलताना म्हणाले.

पारनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पारनेर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते यावेळी.आ.निलेश लंके आ.सुधीर तांबे जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके जि. प.बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, सभापती गणेश शेळके सभापती प्रशांत गायकवाड,

प्रांत अधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार ज्योती देवरे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप गटविकास अधिकारी किशोर माने तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे मुख्य अधिकारी डॉ. सूनिता कुमावत प.स.सदस्य श्रीकांत पठारे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले प.स.सदस्य ताराबाई चौधरी आदी उपस्थित होते.

मुंबई पुणे येथून येणाऱ्या पाहुण्यांना विलगीकरणा मध्ये ठेवा.
तालुक्यातील अनेक व्यक्ती मुंबई पुण्यामध्ये असल्याने सर्वात जास्त धोका तिकडून आहे त्यामुळे बाहेरून येणारे सर्व नागरिक आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरण मध्ये ठेवावे अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या साथीचा रोग हा

आपल्याला नवीन नाही जुन्या पिढीने हा रोग अनुभवलेला आहे पाहिलेला आहे त्यावेळी लोक विलगीकरण मध्ये राहायचे गाव सोडून वाड्या-वस्त्यांवर लोक राहायचे ते जुने अनुभव आपल्याकडे आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!