Sunday, July 3, 2022

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी–मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई, दि. 16

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, राजापूर आणि विशेष बाब म्हणून तिवरे गावातील धरणांची नवीन आणि दुरूस्तीची कामे तातडीने करावीत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीकरिता प्रस्तावित कामे व इतर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख यांनी दिले.

मंत्रालयात श्री.गडाख यांच्या अध्यक्षते खाली सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्या प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, योगेश नाईक, वैभव नाईक, राजन साळवी, शेखर निकम, जलसंधारण विभागाचे अप्पर आयुक्त सुनिल कुंभारे, सहसचिव दिलीप प्रक्षाळे आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेली धरण आणि कालवे संदर्भातील कामे पूर्ण करण्याची मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली.

जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शासन निधीअंतर्गत 14 योजना व महामंडळ निधीअंतर्गत 54 अशा एकूण 68 योजना प्रगतीपथावर आहेत. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहाघर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील जलसंवर्धनाची सुरू असलेली कामे पूर्णत्वास न्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासन निधीअंतर्गत सहा योजना व महामंडळ निधीअंतर्गत 18 योजना अशा एकूण 24 योजना प्रगतीपथावर असून, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश श्री.गडाख यांनी दिले.
या योजना पूर्ण झाल्यानंतर 11 हजार 936.00 हेक्टर सिंचनक्षमता निर्माण होऊन 1 लाख 81 हजार 358 स.घ.मी. पाणीसाठा निर्माण होणार असून, स्थानिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. कणकवली येथील लघु पाटबंधारे योजनेचे निम्म्यापर्यंत असून, आजतगायत रु. 3 हजार 352 लक्ष खर्च झालेला असून स्विकृत निविदा कालावधीनुसार सन 2023-24 मध्ये योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे मंत्री श्री.गडाख यांनी सांगितले.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण 15 योजनांची दुरुस्ती प्रस्तावित असून 7 योजनांना शासनामार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. दरसूची व स्वामित्व धन मधील वाढ झाल्याने 3 अंदाजपत्रके शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्तावित केली आहे. 11 योजनांना शासनामार्फत मान्यतेची प्रक्रिया शासन स्तरावर प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!