Sunday, July 3, 2022

संतापजनक : मुलाचा मृतदेह नगरला तर वडिलांचा पालघरला फेकला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चित्रपटाला लाजवेल अशा खुनाची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एका मिसिंगच्या तक्रारीवरून या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. मालमत्ता हडप करण्यासाठी

चक्क एका विद्यापीठाच्या माजी कुलसचिवाची आणि त्यांच्या उच्चशिक्षित मुलाची हत्या करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील नानासाहेब कापडणीस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव होते. तर मुलगा

अमित कापडणीस एमबीबीएस पदवीधारक होता. त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे आणि यासाठीच दोघांचा खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, आरोपी राहुल जगताप याची अवघ्या महिनाभरापूर्वीच ओळख झाली होती.

कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी साधारण आठवडा भराच्या अंतरावर राहुल जगताप याने खून केले होते. विशेष म्हणजे, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्हीही मृतदेह वेगेवेगळ्या जिल्ह्यात फेकून दिले होते. नानासाहेब कापडणीस

यांचा पालघर जिल्ह्यात तर मुलाचा मृतदेह नगर जिल्ह्यात फेकून दिला होता.मयत यांचे नातेवाईक म्हणजेच आई आणि बहीण हे अमेरिकेत राहतात. ते वर्षानुवर्षे येणार नाहीत त्यामुळे सगळ काही हडप करत स्वतः नानासाहेब कापडणीस आहे .

म्हणून राहुल जगताप याने सुरुवात केली होती. मात्र मुंबईतच राहत असलेले आई आणि बहीण यांनी वडिलांना आणि मुलाला कॉल केले मात्र संपर्क न झाल्याने नाशिकमध्ये येऊन बघितले होते. मात्र संपर्क न झाल्याने ते पोलिसांना न कळविताच निघून गेले होते.

नंतर मात्र महिना उलटून गेला काहीच संपर्क होत नसल्याने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दोन जिल्ह्यात फेकून दिलेल्या मृतदेहासह टेक्निकल गुन्ह्याची उकल केली.

फक्त आणि फक्त मयतांचे झालेले व्यवहार हाच धागा धरून नाशिक पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!