Wednesday, December 8, 2021

रेमडेसिवीर औषध झालं स्वस्त

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा, काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली. रेमडेसिवीर औषधाच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. शिवाय एका यंत्रणेमार्फतच या औषधाचा पुरवठा केला जातो आहे.

रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या देशातील 7 प्रमुख औषध कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटरवर सातही कंपन्यांच्या रेमडेसिवीरच्या 100 mg कुपीचे आधीचे आणि नवे दर टाकले आहेत. त्यावर नजर टाकूयात.

Cadila Healthcare Limited कंपनी रेमडेसिवीर REDMAC नावाने विकते. ज्याची किंमत आधी 2800 रुपये होती. ती आता 899 रपये करण्यात आली आहे.
Syngene International Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर RemWin या नावाने आहे. 3950 रुपये किंमत असलेले हे औषध आता 2450 रुपयांना आहे.

Dr. Reddy’s laboratories Ltd. कंपनीमार्फत हे औषध REDYX म्हणून दिलं जातं. ज्याची किंमत आधी 5400 आणि आता 2700 रुपये आहे.Cipla Ltd.कंपनी CIPREMI नावाने रेमडेसिवीर औषध देते. या कंपनीने औषधाचे दर 4000 वरून 3000 रुपये केले आहेत.

Mylan Pharmaceuticals Pvt Ltd. कंपनी DESREM ब्रँडने रेमडेसिवीरचं उत्पादन घेतं. याची किंमत 4800 होती. आता ती कमी करून 3400 रुपये करण्यात आली आहे.Jubilant Generics Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर JUBI-R म्हणून मिळतं. 4700 रुपयांचं हे औषध आता 3400 रुपयांना मिळेल.

Hetero Healthcare Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर COVIFOR ब्रँडने आहे. ज्याची किंमत 5400 वरून 3490 करण्यात आली आहे

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!