Saturday, July 2, 2022

फेसबुकचा नवा निर्णय :काय आहे कारण ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सध्या फेसबुककडून अनेक बदल करण्यात येत आहे. मागेही युजर्सच्या खासगी माहिती संदर्भात फेसबूकने आपल्या सुरक्षेसंबंधीत धोरणांमध्ये मोठा बदल केल्याचे आपण पाहिले आहे.

मेटाने फेसबुक न्यूज फीडचे नाव बदलले आहे. न्यूज फीडला आता फक्त ‘फीड’ म्हटले जाईल. ब्रँड प्लॅटफॉर्मवर काही महत्त्वाचे बदल करत असल्याचे मेटाने सांगितले आहे. ‘न्यूज फीड’मध्ये ‘न्यूज’चा

उल्लेख केल्याने युजर्सची दिशाभूल होऊ शकते. ‘न्यूज’ लेबलमुळे काहींना असे वाटू शकते की यात, केवळ बातम्या आहेत. त्यामुळे फेसबुकने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘आजपासून, आमचे न्यूज फीड

आता ‘फीड’ म्हणून ओळखले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. ‘न्यूज फीड’ हे नाव गेल्या 15 वर्षांपूर्वी पहिल्यांदा फेसबुककडून देण्यात आल होते.फेसबुकव्दारे एका निवेदाव्दारे सांगण्यात आले आहे की, युजर्स त्यांच्या फीडवर पाहतात

त्या सर्व प्रकारचे कंटेंट अजून चांगल्या पध्दतीने दाखवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फीड या नवीन नावामुळे अॅपमधील फीचरर्सवर कुठलाही बदल होणार नसल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले आहे.

दरम्यान, मेटाकडून आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये असे काही बदल केले जाणार आहेत, की त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘अल्गोरिदम’ चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्ट शोधण्याचे आणि काढून टाकण्याचे काम करु शकणार आहेत.

न्यूजफीडचे नाव फीड असे बदलून फेसबुक आपले प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करीत आहे. कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला घोषणा केली की, ती फ्रान्समधील त्यांच्या वापरकर्त्यांसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन ‘न्यूज’ टॅब आणत आहे.

हा नवीन न्यूज टॅब विश्वसनीय बातम्या स्रोतांच्या श्रेणीतील बातम्या दाखवण्यास मदत करणार आहे. त्यामुळे, ‘न्यूजफीड’ मधून ‘बातम्या’ काढून टाकणे फेसबुकसाठी बातम्या आणि सामान्य नॉन-न्यूज फीडमध्ये फरक करण्याचा एक पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!