Saturday, July 2, 2022

नगर ब्रेकिंग:या कालव्यात आढळला अनोळखी महिलेचा त्या अवस्थेत मृतदेह

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा – पिंपळगाव फुणगी शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचे कुजलेल्या

अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंग असल्याचे आढळून आले.गुहा-पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजवा कालव्यातून रोटेशन सुरु असून बुधवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्यानचे

स्थानिक नागरिकांना आढळून आल्यानंतर येथील पोलीस पाटील व सरपंच यांना या मृतदेहाबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळवली.

त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्यासह सहायक फौजदार एन. आर. शिंदे, पो. हे. काँ. लक्ष्मण बोडखे घटनास्थळी दाखल झाले. प्रवरा उजव्या कालव्यातील

पाण्यावर तरंगत असलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!