Saturday, July 2, 2022

धक्कादायक नगर जिल्ह्यातील या तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे.रस्त्यावरून जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी एकावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कार्तीक राजेंद्र काळे ( 20, रा. आयशानगर, शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. अपहरणाची घटना मंगळवार (दि.16) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शेवगाव-नेवासा रोडवर घडली.

या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनीच मुलींची सुटका केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आईने

दिलेल्या फिर्यादीवरून कार्तिक राजेंद्र काळे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या दोन्ही मुलींचे आरोपीने अपहरण कशासाठी केले, याचा शोध

पोलीस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!