माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात उसने दिलेले चार लाख परत न मिळाल्याने डिप्रेशन खाली गेलेल्या तरुणाने विषारी पदार्थ घेत आत्महत्या केली.
गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.बाळू ऊर्फ बाळासाहेब जगन्नाथ कोतकर (रा. निंबळक ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मयत गणेश कोतकर यांचा भाऊ संदीप कोंडिबा कोतकर यांनी फिर्याद दिली आहे. गणेश कोतकर यांनी बाळू कोतकर याला मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी हात उसने चार लाख रुपये दिले होते.
गणेश यांनी बाळूकडे चार लाख रुपयांची वेळोवेळी मागणी करून देखील त्याने ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे गणेश हा डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. बाळूने चार
लाख परत दिले नाही म्हणून गणेशने विषारी पदार्थ घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.