माझा महाराष्ट्र न्यूज : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. बँकेने मुदत ठेवींवर (FD) व्याजदर वाढवले आहेत.
SBI ने 15 फेब्रुवारी 2022 पासून एफडीवरील व्याजदरात 15 बेस पॉइंट्स किंवा 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीमुळे तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 5.30 टक्क्यांवरून
5.45 टक्के झाला आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5.80 टक्क्यांवरून 5.95 टक्के करण्यात आला आहे.
दोन वर्षापासून ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या FD वरील व्याजदर पूर्वीच्या 5.10 टक्क्यांवरून 10 आधार अंकांनी 5.20 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5.60 टक्क्यांवरून
5.70 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, पाच वर्षे ते 10 वर्षे एफडीवरील व्याजदर पूर्वी 5.40 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ६.२० टक्क्यांवरून ६.३० टक्के करण्यात आला आहे.
हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहेत. एसबीआयने दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीवरील व्याजदरात बदल केलेला नाही. दोन वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या
FD वरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच राहतील, परंतु याशिवाय इतर मुदतीसाठी व्याज वाढवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच रेपो दरात बदल न करण्याची घोषणा केली असतानाच बँकेने हा निर्णय घेतला आहे.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी त्यांच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) पुनरावलोकनाची घोषणा करताना, रेपो दर कोणताही बदल न करता 4% वर राहील असे सांगितले होते.
MSF दर आणि बँक दर 4.25% वर अपरिवर्तित राहतील. रिव्हर्स रेपो दर देखील 3.35% वर अपरिवर्तित राहील.