माय महाराष्ट्र न्यूज: नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन ग्रामपंचायत मिळून नगरपरिषद तयार करण्याचा प्रस्ताव राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शासन स्तरावर मांडला हाेता.
त्याला नगर विकास मंत्रालयाने देखील मंजुरी देत त्यावर हरकती मागविल्या हाेत्या. पंरतु राज्यमंत्री तनपुरे यांच्या या महत्त्वकांक्षी नगरपरिषदेच्या प्रस्तावाला माजी आमदार शिवाजी कर्डिले
यांनी सुरूंग लावला आहे. कर्डिले यांचे वर्चस्व असलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत त्याविराेधात ठराव मंजूर झाला आहे. नागरदेवळे ग्रामपंचयातीने काल नगरपरिषदेच्या ठरावासाठी विशेष ग्रामसभा बाेलावली हाेती. त्यात १ हजार ६२ ग्रामस्थांनी सहभाग नाेंदवला.
ग्रामपंचायतीने बाेलविलेल्या ग्रामसभेला पहिल्यांदाच एवढी माेठी गर्दी झाली हाेती. त्यात नगरपरिषदेचा ठराव ठेवण्यात आला. त्या ठरावावर ग्रामपंचायतीच्या बाजूने ५७८, तर नगरपरिषदेच्या
बाजूने ४८४ ग्रामस्थांनी मते नाेंदवली. ही ग्रामसभा सरपंच सविता पानमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नागरदेवळेतील या ग्रामसभेमुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगरपरिषदेच्या प्रस्तावाला सुरूंग लागला आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.