माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्यावतीने दहावीची परीक्षा मार्च 2022 मध्ये होणार आहे.या बोर्डाच्या परिक्षेसाठी प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने
मंडळाच्या या संकेतस्थळावर शुक्रवार, दि. १८ फेब्रुवारी दुपारी १.०० वाजल्यापासून mahahsscboard.in वर उपलब्ध होतील.राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 या कालावधीत घेण्यात
येणार आहेत. तर इयत्ता 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 03 मार्च 2022 या कालावधीत होणार आहेत. महाराष्ट्राच्या HSC आणि SSC 2021-22 च्या थिअरी परीक्षा मार्चमध्ये सुरू होणार आहेत.
इयत्ता 12वीच्या परीक्षा 04 ते 30 मार्च 2022 दरम्यान आणि 10वीच्या परीक्षा 15 मार्च ते 04 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र SSC परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केले आहे. इयत्ता 10वी आणि 12वी अर्थात उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिकच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या
संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे प्रदान केले जातील. प्रवेशपत्रावर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे दिली जातील.