माय महाराष्ट्र न्यूज:कर्जासाठीची एक नवी योजना पेटीएम घेऊन आलं असून या योजनेची फारच चर्चा रंगली आहे. पाच लाख रुपयांपर्यंत विना गॅरंटी लोन पेटीएम देतंय.या योजनेबद्दलची
सगळी माहिती आता जाणून घेणार आहोत. अत्यंत कमी व्याजदरात पेटीएमनं विना हमी लोन देण्याची योजना समोर आणली आहे. अनेकांनी या योजनेचा लाभही घेतला असून ही योजना नेमकं काम कशी करते?
ते समजून घेणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कर्ज घेण्याच्या योजनेत दरदिवशी थोड्या-थोड्या प्रमाणात ईएमआय (EMI) भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.
छोटा-मोठा व्यापार करणाऱ्यासाठी पेटीएमनं गूडन्यूज दिली आहे. डिजीटल पेमेंट सर्विस ऍप असलेल्या पेटीएमनं छोट्या व्यावसायिकांना पाच लाखांचं कर्ज देण्याची योजना आणली आहे.
या योजनेसाठी एनबीएफसीसोबत पेटीएमनं करार केलाय. या कर्जाच्या योजनेला कोलॅटरल फ्री इन्टंट लोन असंही म्हणतात. पेटीएम ऍपच्या माध्यमातून मर्चंट लिडिंग प्रोग्रामच्या माध्यमातून हे कर्ज देण्यात येईल.
हे लोन घेतलेल्यांना परफेड वेळेच्या आधी करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. तसंच पाच लाख रुपयांचं हे लोन मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरीक्त कागदपत्रांची गरज लागणार नाही. लोन प्रीपेमेंटवर कोणताची चार्ज घेतला जात नाही.
1 पेटीएम फॉर बिझनेस ऍपमध्ये गेल्यावर बिझनेल लोन आयकॉनवर क्लिक करा. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची पडताळणी करा. गरजेप्रमाणे कर्जासाठी रक्कम कमी जास्त करुन घ्या.
2 एकदा का रक्कम निश्चित केली की त्यानंतर एकूण रक्कम, द्यायवयाची एकूण रक्कम, दरदिवशी भरावा लागणारा ईएमआय, कालावधी यांसारखे डिटेल्सही तातडीनं समोर येतील.
3 आपले सगळे डिटेल्स तपासून घ्या. चेक बॉक्सवर क्लिक करा आणि गेट स्टार्टेडवर टॅप करा. याननंतर आपले CKYC च्या माध्यमातून केव्हायसी डिटेल्स मिळवा आणि पुढच्या प्रकियेसाठी परवानगी द्या.
4 यानंतर एक नवी विंडो समोर येईल. त्यात आपलं पॅन काईड, जन्मतारीख, ईमेल यासारखे डिटेल्स कन्फर्म करा. यानंतर पुन्हा एकदा ऑफर कन्फर्मेशनसह पुढे जाता येईल. यानंतर पॅन कार्ड वेरीफाय झाल्यावर आपला क्रेडीत स्कोअर किती आहे, हे पाहून केव्हायसी वेरीफाय केले जातील.
5 यानंतर कर्जासाठीचा आपला अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्या अकाऊंटवर कर्जाची रक्कम वितरीत केली जाईल. पण त्याआधी अर्ज सबमिशन आधी एकदा संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.