Saturday, July 2, 2022

तुमच्याकडे फाटलेली किंवा खराब झालेली नोट आहे का? काय करायचं जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुमच्याकडे फाटलेली किंवा खराब झालेली नोट आहे का? बदलायची असेल तर आरबीआयचे नियम समजून घ्या तुमच्याकडेही फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण अनेकदा घाईगडीबडीत आपल्याकडे फाटलेल्या नोटा येतात. मात्र त्या पुन्हा दुकानदाराला द्यायला गेलो की तो परत नाही. अनेकदा यावरून भांडणंही होता. दुसरीकडे खिशात एखादी नोट विसरून जातो आणि कपडे धुताना ओल्या होतात आणि फाटतात.

त्यामुळे आता या नोटा कश्या बदलायचा असा प्रश्न पडतो. या नोटा तुम्ही सहज बदलू शकता. आरबीआयने फाटलेल्या नोटांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्याअंतर्गत तुम्ही तुमच्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. तुम्ही या नोटा कशा बदलू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या २०१७ च्या चलनी नोटा बदलण्याच्या नियमांनुसार, जर तुम्हाला एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळाल्या, तर तुम्ही त्या बँकेत बदलू शकता. कोणतीही सरकारी बँक ती

बदलण्यास नकार देऊ शकत नाही. ५, १०, २० आणि ५० रुपयांच्या छोट्या नोटा, ज्यातील किमान ५० टक्के भाग सुरक्षित असेल, तर तुम्ही तुमची नोट सहज बदलू शकता. जर फाटलेल्या नोटांची संख्या २० पेक्षा जास्त असेल आणि नोटांचे

मूल्य ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेला काही फी भरावी लागेल. नोटेचा काही भाग पूर्णपणे फाटला असेल, नोटेचे दोन तुकडे झाले असतील किंवा अर्धी नोट जळली असेल, तर तुम्ही अशा नोटा फक्त आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये बदलू शकता.

येथे तुम्हाला एक फॉर्म सबमिट करावा लागेल. या व्यतिरिक्त जर कोणत्याही बँकेने तुमच्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला, तर तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या लिंकवर जाऊन तक्रार करू शकता.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!