नेवासा/सुखदेव फुलारी
नगर येथील वाचन संस्कृती व महिला सबलीकरण चळवळीतील कार्यकर्त्या सौ.बेबीताई अशोक गायकवाड यांना पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते
सन २०१७-१८ या वर्षासाठीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शेवगाव तालुक्यातील दहीगाव-ने माहेर असलेल्या बेबीताई यांचे पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी हे सासर. हा दुष्काळी भाग असल्याने परिस्थितीमुळे बेबीताई कुटूबासह १९९४ साली नगरला आल्या. पतीला एका कंपनीत रोजगार मिळाला, लवकरच कंपनी बंद पडली. गायकवाड कुटूंबासह पाचशे कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला अन् तिथून सुरू झाला जगण्याचा संघर्ष. बेबीताईने अहमदनगर शहरातील प्रोफेसर चौक भागात भाजीचं दुकान सुरू केलं.
समाजासाठी काही करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय यांची पुस्तकं वाचत त्यांच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी २० महिलांसोबत त्यांनी ‘क्रांती ज्योती महिला मंडळ’ सुरू केलं. आज काळ बदलला तरी विधवा महिला कुंकू लावत नाहीत. समाजही हे मान्य करत नाही. हे त्यांनी हेरलं. ही पद्धत बंद पाडायची हेच पहिलं काम बेबीताईंनी हाती घेतलं.2012 सालचा मकर संक्रांतीचा दिवस. शहीद सैनिकांच्या वीरपत्नींसाठी बेबीताईंनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजला. राज्यातील हा पहिलाच कार्यक्रम. या कार्यक्रमाला विधवा महिला उपस्थित राहतील की नाही ही मोठी शंका होती. मात्र तब्बल २९ महिला या कार्यक्रमाला आल्या. त्यानंतर पुढील प्रत्येक कार्यक्रमाला या महिला आपल्या कुटुंबासह उपस्थित रहात आहेत. दर संक्रांतीला हा कार्यक्रम होतो. अगदी तरुणपणी वैधव्य आलेल्या दोघींचे त्यांनी पुनर्विवाहही करून दिले.
भाजी विकता विकता त्यांनी वाचनाचा छंद ही जोपसला,स्वत्: बरोबर अडानी ससुला ही वाचन्यास शिकवले.राज्य सरकारने त्यांना पहिला भाषा संवर्धक मंगेश पाडगावकर पुरस्कार देऊन सन्मानित केले.
स्वंयंसिद्धा:- २०१४ मध्ये ‘स्वंयंसिद्धा फाउंडेशनची’ स्थापना करून नगर शहरापुरतं काम मर्यादित न ठेवता जिल्हा आणि राज्यभरात नेले.
या सर्व कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने त्यांना सन २०१७-१८ या वर्षासाठीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर केला होता.
सौ.बेबीताई गायकवाड़ यांना सदर पुरस्कार दि. ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिन समारंभात
पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर आदि यावेळी उपस्थित होते.