नेवासा
तालुक्यातील सौंदाळा येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी सौंदाळा येथील लहुजी चौक येथे ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमात मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे, सौंदळा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चामुटे, उपाध्यक्ष दिलीप बोधक,पत्रकार सुखदेव फुलारी,कारभारी गरड,बाळासाहेब आरगडे,नारायण आरगडे,शिवाजी आरगडे, दामोदर शिंदे, लहुजी सेनेचे तालुका प्रमुख संतोष साठे,महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीताई भोसले, मंगलाताई चव्हाण,किशोर आढागळे, सत्यवान खंडागळे, भारत नेटके, संजय आढागळे, किरण सुपेकर, भारत आढागळे, आकाश नेटके, भारत खंडागळे, राहुल आढागळे यावेळी आदी उपस्थित होते.
लहुजी सेनेचे राज्य प्रमुख सुरेश आढागळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हनीफ भाई पठाण व काशिनाथ आढागळे यांनी सूत्रसंचालन केले.