Saturday, July 2, 2022

मुका घेण्याच्या वक्तव्यावरून भाजपाचा हा नेता चांगलाच अडचणीत ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला

असून तो रद्द करण्यात यावा, म्हणून दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य शिरूर येथील एका कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते. दरेकर यांच्या वक्तव्यानंतर

त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातील महिलांनीही टिका, निषेध नोंदवला होता. तसेच दरेकर यांना केलेल्या वक्तव्याबाबत महिलांची माफी मागण्यासही सांगितले होते. मात्र, दरेकरांनी माफी मागितली नाही.

दरेकरांनी महिलांचा अनादर करत बेताल वक्तव्य केले असून या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

त्यानुसार, दरेकर यांच्यावर सीआरपीसी ४८२ आणि आयपीसी ५०९ या कलामांतर्गत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.हा गुन्हा रद्द करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल धाव घेतली आहे.

त्यावर गुरुवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. याचिकेची दखल घेत खंडपीठाने राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर या प्रतिवाद्यांना नोटीस बजावत सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!