माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना संक्रमण काळात सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्रासाठी आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे राज्य सरकारने गुरुवारी दुजोरा दिला.
राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, ठाण्यातील एका फार्ममधील अनेक पोल्ट्री पक्ष्यांचा H5N1 एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून 23,800 कुक्कुट पक्ष्यांची गणना करण्यात आली आहे. संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर
प्रोटोकॉलनुसार सर्वांना मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच केरळमध्येही बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे.
तेथे हजारो कोंबड्या मारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शाहपूर तहसीलमधील एका फार्ममध्ये सुमारे 200 कुक्कुट पक्षी होते
त्यापैकी काही 2, 5 आणि 10 फेब्रुवारी रोजी मरण पावले. मात्र, सुरुवातीला या मृत्यूची माहिती फार्मने प्रशासनाला दिली नाही. 10 फेब्रुवारी रोजी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्यानंतर 11 आणि 13 फेब्रुवारी
रोजी नमुने गोळा करून पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. येथे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळच्या राष्ट्रीय
उच्च सुरक्षा पशु रोग संस्थेलाही पाठवण्यात आले. सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, लॅबचा अहवाल बुधवारी रात्रीच प्राप्त झाला, त्यात बर्ड फ्लूची खात्री झाली आहे.