माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचे
उद्घाटन निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या हस्ते करण्यात आले.चहाच्या दुकानाला सरपंच, उपसरंपच अशी नावे दिलेलं काहींना सहन झालं नाही. त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला.
मात्र, अनेक प्रकारच्या दुकानांना आपले राष्ट्रपुरूष आणि संतांची नावे दिली आहेत. अशा पाट्या तुम्ही कशा सहन करता?’ अशा शब्दांत कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी ठणकावलं आहे.
यापुढे कोणत्याही दुकानांवर राष्ट्रपुरुष आणि संतांची नावे न लावण्याचा संकल्प शिवजयंतीच्या निमित्ताने करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकरांनी आपल्या खास शैलीत दुकानांच्या पाट्यांचा विषय छेडला.
ते म्हणाले, ‘सरपंच आणि उपसरपंच यांच्या नावाने चहाची दुकाने टाकली गेली तर हा आमच्या पदाचा अपमान आहे असे सांगून त्यांनी ही नावे देण्यास विरोध केला. अडीच वर्षे पदावर राहणाऱ्या
व्यक्तींना हे सहन होत नाही, तर वर्षानुवर्षांचा इतिहास असलेल्या राष्ट्रपुरुषांचा, संतांचा अपमान दुकानांवर पाट्या लावून होत नाही का? आपल्या राष्ट्र पुरुषांची किंवा संतांची होत असलेली अवहेलना आपण थांबवू शकलो नाही तर धर्म टिकणार
कसा? कोणताही व्यवसाय राष्ट्रपुरुष आणि संतांच्या नावाने सुरू केला जातो. संताचा विचार वारकरी संप्रदायाने जपला, म्हणून आज धर्म टिकून आहे. राष्ट्रपुरुषांनी त्याग केला, कष्ट घेतले म्हणून स्वातंत्र्य आणि स्वराज्य
मिळाले हे आपण विसरलोच कसे? त्यांच्या स्मृती विचाराने आणि कृतीने जागृत ठेवण्याची आवश्यकता असताना आता संत आणि राष्ट्रपुरुष समाजात फक्त नाव देण्यापुरतेच राहिले आहेत,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.