माय महाराष्ट्र न्यूज:तुमच्या घरात शेवगाव तालुक्यातील जनतेने चार-चार वेळा आमदारकी दिली. मग इतक्या दिवस पूर्व भागाचा विकास का झाला नाही, असे प्रतिपादन जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी कोळगाव येथे केले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथे साठवण बंधार्याचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. काकडे म्हणाल्या, पदे ही सर्वसामान्य जनतेमुळेच मिळतात.
आम्ही जनशक्तीचे सर्व जि. प. गट, गणात उमेदवार उभे करणार आहोत. जनतेने आता तिसरा पर्याय स्विकारावा. आमच्या उमेदवाराला आम्ही उभे आहोत असे समजून मतदान करावे.
त्या उमेदवारांकडून काम करून घेण्याची हमी आम्ही देतो, असेही काकडे म्हणाल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत महाराज झिरपे होते तर अॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, भाऊसाहेब सातपुते,
नवनाथ ढाकणे, विश्वास ढाकणे, विक्रम ढाकणे, अशोक ढाकणे, रामजी मडके, अशोक शिरसाट, विक्रम काकडे, बप्पासाहेब गाढे, माणिकराव शेळके, योगेश तेलोरे, अर्जुन खंडागळे आदी यावेळी उपस्थित होते.