Wednesday, December 8, 2021

ऑक्सिजन हवेतून मिळण्यासाठी साईबाबा संस्थानने तातडीने प्लँट सुरु करावा – पालकमंत्री मुश्रीफ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोविडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोविडबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज पडते. येणाऱ्या काळात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याने, कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक

ऑक्सिजन वायूच्या पुरेशा उपलब्धतेसाठी साईसंस्थानने साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल येथे हवेतून ऑक्सिजन मिळण्यासाठी आवश्यक प्लँट तातडीने उभारण्याचे निर्देश पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.

राहाता तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, शिर्डी परिसरातील कोविड केअर सेंटरची पाहणी तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित

प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसलिदार कुंदन हिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ओमप्रकाश पोखर्णा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, सचिन चौगुले, रमेश गोंदकर यावेळी उपस्थित होते.

साईबाबा सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे जवळपास 550 बेड्स असून त्यापैकी 150 बेड्स नॉन-कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवावे आणि उर्वरित चारशे बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सूचना यावेळी पाकलमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केली.

कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या बेड्ससह ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याचे तसेच यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने कारवाई सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री महोदयांनी दिले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनीही स्वयंशिस्तीचे पालन करुन जनता कर्फ्यु लागू करावा, असे आवाहन यावेळी मंत्रीमहोदयांनी केले. यासाठी ग्राम समिती आणि प्रभाग समित्यांनी पुढाकार घेण्याची सूचना त्यांनी केली.

राहाता व आजूबाजूच्या तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचारासाठी शिर्डी येथे योग्य व्यवस्था केल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, अशी आशा मंत्री श्री.मुश्रीफ व्यक्त केली.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!