माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीसाठी
बाधित शेतकर्यांना वाढीव दराने उर्वरित मदत वितरीत करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील बाधित शेतकर्यांना 1 हजार 35 कोटी 14 हजार रुपये इतका निधी संबंधित जिल्ह्यांना
वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना 15 कोटी 78 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.ऑगस्ट-सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव
दरानुसार आवश्यक निधीपैकी उर्फ 75 टक्के एवढा असा दोन लाख 286084.07(अक्षरी रुपये दोन हजार आठशे साठ कोटी चौर्याऐंशी लाख सात हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णय सोबत
जोडलेल्या सह पत्रात जिल्हा न्याय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.यात जिल्ह्यात सर्वाधिक निधी शेवगाव तालुक्यासाठी तर त्याखालोखाल पाथर्डी तालुक्याला नुकसान
भरपाई निधी प्राप्त झाला होता जिल्ह्यातील नगर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर व कोपरगाव आदी सहा तालुक्यातील 258 गावांतील 76 हजार 593 बाधित शेतकर्यांना
28 कोटी 33 लाख 68 हजार रुपये निधी वाटप करण्यात आला होता. आताही या तालुक्यातील शेतकर्यांना मदत मिळणार आहे.