माय महाराष्ट्र न्यूज:सोमवार 1 मे 2023 पासून 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 171 रुपये 50 पैसे स्वस्त झाला आहे.
आता 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 856 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात एलपीजी पुरवठादार कंपन्यांनी बदल केलेला नाही.
दरकपात केल्यानंतर मुंबईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 808 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी
सिलेंडर 1 हजार 960 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. दिल्लीत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 856 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. चेन्नईत 19 किलो वजनाचा
व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2 हजार 21 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार याआधी 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दिल्लीत 2 हजार 28 रुपये,
कोलकातामध्ये 2 हजार 132 रुपये, मुंबईत 1 हजार 980 रुपये तर चेन्नईत 2 हजार 192 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध होता.