Friday, December 3, 2021

आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासाच्या निर्बंधांबाबत केंद्राचे राज्यांना महत्त्वाचे आदेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलेलं आहे. शुक्रवारी (16 एप्रिल) देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. एखाद्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले असले किंवा एखाद्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला असला,

तरीही आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाला नागरिकांना, तसंच मालवाहतुकीला कोणत्याही ठिकाणी बंदी घातली जाऊ नये,असं केंद्रीय गृह मंत्रालयाने पाठवलेल्या या पत्रात लिहिलं आहे.केंद्रीय मंत्रालयांच्या अखत्यारीत येणाऱ्या तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या हॉस्पिटल्सचाही वापर कोविड

रुग्णांसाठी करण्याचे निर्देश केंद्रानेराज्यांना दिले आहेत. रायपूर आणि लखनऊमध्ये कोविड रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत आहे. त्यांनी नॅशनल हेल्थ मिशनच्या (NHM) निधीचा वापर करून निवृत्त डॉक्टर्सनाही सेवेत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

तसंच एनएसएस, बचत गटांसारख्या संस्था-संघटनांकडूनही साह्य घेण्यास सांगण्यात आलं आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, कोरोना काळातली योग्य वर्तणूक आणि लसीकरण ही पंचसूत्री अवलंबण्यचा पुनरुच्चार केंद्र सरकारने केला आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या तीनच राज्यांत एक लाखाहून अधिक अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!